Mayur Ratnaparkhe
हायड्रोजन बॉम्ब, ज्याला थर्मोन्यूक्लियर बॉम्ब असेही म्हणतात, हे एक अतिशय शक्तिशाली अणु शस्त्र आहे.
हे अणुबॉम्बपेक्षाही अधिक विनाशकारी आहे. त्याचा स्फोट लाखो लोकांचा बळी घेऊ शकतो. फक्त काही देशांकडेच हा बॉम्ब आहे.
हायड्रोजन बॉम्ब हे एक प्रगत अणुशस्त्र आहे जे हायड्रोजनच्या आइसोटोप्स ड्युटेरियम आणि ट्रिटियमच्या फ्यूजनद्वारे ऊर्जा निर्माण करते.
या बॉम्बमध्ये प्रथम एक लहान अणुस्फोट होतो. त्यानंतर अतिशय प्रचंड प्रमाणात ऊर्जा वित्सर्जित प्रक्रिया सुरू होते.
हायड्रोजन बॉम्बची शक्ती टन किंवा मेगाटन टीएनटी (स्फोटक) मध्ये मोजली जाते.
१-मेगाटन हायड्रोजन बॉम्ब १ दशलक्ष टन टीएनटीच्या बरोबरीचा स्फोट निर्माण करतो.
हायड्रोजन बॉम्ब हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षा शेकडो पट जास्त शक्तिशाली आहे.
हायड्रोजन बॉम्बची ताकदच त्याला जागतिक शांततेसाठी एक मोठा धोका बनवते.
जर हायड्रोजन बॉम्बचा कुणी वापर केलाच तर त्याचे दीर्घकालीन पर्यावरणीय आणि आरोग्यावरही परिणाम होऊ शकतात.
esakal