जिलेबीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात?

Anushka Tapshalkar

जिलेबी

तुपात तळलेली, गरमागरम आणि रसाळ जिलेबी सर्वच भारतीयांना फार प्रिय आहे. भारतातील सर्वात लोकप्रिय मिठाईंपैकी ही एक आहे.

Jalebi

|

sakal

जिलेबीचा इतिहास

उत्सव किंवा विशेष प्रसंग असो, जिलेबीची उपस्थिती नक्कीच असते. भारतातील लोकप्रिय गोड पदार्थ, परंतु तिचे मूळ नाव 'Zulabiya / Zalabiya' असून उगम मध्यपूर्वेत झाला आहे.

Jalebi

|

sakal

जिलेबी कशी बनते?

फर्मेंटेड पीठ गोलाकार चकलीसारखे वळून गरम तेलात तळली जातात. कुरकुरीत झाल्यावर ती गरम साखरेच्या पाकात भिजवली जाते, ज्यामुळे तिला चमक आणि गोडी मिळते.

Jalebi

| Sakal

जिलेबीची चव

बाहेरून कुरकुरीत, आतून रसाळ. तोंडात टाकताच साखरेचा रस पसरतो. रबडी, दही किंवा आइस्क्रीमसोबत खाल्ल्यास जिलेबी अजूनच चविष्ट लागते.

Jalebi

| Sakal

जिलेबीचा उगम आणि लोकप्रियता

जिलेबीचा उगम मध्यपूर्वेत झाला. आज भारताबरोबर पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि काही आफ्रिकी देशांतही ती तितकीच प्रिय आहे.

Jalebi

| sakal

वर्ल्ड जिलेबी डे

दर वर्षी ३० जुलैला World Jalebi Day साजरा केला जातो.

Jalebi

| Sakal

जिलेबीसाठी प्रसिद्ध शहरं

जबलपूरची खवा जिलेबी, मथुरेची आलू जिलेबी आणि भरतपूरची जिलेबी भारतात प्रसिद्ध आहेत.

Jalebi

|

sakal

जिलेबीला इंग्रजीत काय म्हणतात?

जिलेबीला इंग्रजीत स्वीट प्रेट्झेल(Sweet Pretzel), कॉइल्ड फनेल केक(Coiled Funnel Cake) किंवा इंडियन सिरप-कोटेड डेसर्ट(Indian Syrup-Coated Dessert) असे म्हणतात.

Jalebi

|

sakal

Smart Cooking Hacks: स्वयंपाक करताना 'या' 6 गोष्टी ठेवा लक्षात

Smart Kitchen Tips for Daily Cooking

|

sakal

आणखी वाचा