Anushka Tapshalkar
कलमा म्हणजे इस्लामधील शहादत, म्हणजेच श्रद्धेची शपथ. इस्लाममध्ये तो धर्म स्वीकारण्याचा पहिला टप्पा मानला जातो.
कलमाच्या मुख्य ओळी आहेत – "ला इलाहा इल्लल्लाह, मुहम्मदूं रसूल अल्लाह" – ज्याचा अर्थ: "अल्लाहशिवाय दुसरा कुणी ईश्वर नाही आणि मोहम्मद हे त्याचे पैगंबर आहेत."
कलमाला इस्लाम धर्मात अत्यंत पवित्र आणि मूलभूत स्थान आहे. मुस्लिम होण्यासाठी हे वचन पूर्ण श्रद्धेने म्हणणे आवश्यक आहे.
‘कलमा तय्यब’ म्हणजे सर्वात महत्त्वाचा कलमा, जो धर्म स्वीकारताना वाचला जातो.
सुन्नी आणि शिया दोघेही कलमा वाचतात. मात्र शिया कलमात "अलीयुन वलिउल्लाह" ही अतिरिक्त ओळ असते.
सौदी अरेबिया, अफगाणिस्तान यांसारख्या देशांच्या ध्वजावर कलमाचे शब्द लिहिलेले असतात.
दहशतवादी अनेकदा लोकांना धर्म ओळखण्यासाठी आणि कलमा वाचण्यासाठी भाग पाडतात.
प्राध्यापक देबाशिष भट्टाचार्य यांनी "ला इलाहा" चा जप केल्याने त्यांचा जीव वाचल्याची घटना समोर आली आहे.
कलमा हा केवळ शब्दांचा समूह नसून श्रद्धा, समर्पण आणि धर्माचे मूलभूत तत्त्व आहे.