Anushka Tapshalkar
हिरवीगार कुरणं, बर्फाच्छादित शिखरं, आणि नेत्रदीपक निसर्ग सौंदर्यानं नटलेलं पहलगाम हे ‘भारताचं स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखलं जातं.
हिंदू भाविकांच्या अमरनाथ यात्रेच्या मार्गावरचं महत्त्वाचं स्थान म्हणजे पहलगाम. यात्रेदरम्यान हजारो भाविक इथून प्रवास करतात.
पहलगामपासून पाच किलोमीटरवर वसलेलं बैसरन हे उंचीवरचं सुंदर गवताळ मैदान आहे. ट्रेक किंवा घोड्यावरूनच इथे पोहोचता येतं.
शेषनाग आणि तुलियान हे बर्फाच्छादित तलाव ट्रेकर्ससाठी स्वर्ग मानले जातात. जूनपर्यंत गोठलेलं पाणी आणि आजूबाजूचं सौंदर्य मन मोहून टाकतं.
डोंगरांच्या कुशीतली अरू व्हॅली आणि लिडरवाट या ठिकाणी ट्रेकिंगसाठी आणि कॅम्पिंगसाठी पर्यटक गर्दी करतात.
‘बेताब’ चित्रपटात दिसलेली प्रसिद्ध बेताब व्हॅली, आणि इतरही अनेक चित्रपटांचं शूटिंग इथे झालं आहे.
2024 मध्ये तब्बल 35 लाख पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली होती, यातील अनेकांनी पहलगामचा निसर्ग अनुभवला.
इथे स्नो लेपर्ड (हिमबिबट्या), आशियाई काळे अस्वल, लाल कोल्हा, कस्तुरी मृग यांसारख्या दुर्मिळ प्राण्यांचे निवासस्थान आहे.
13,200 लोकसंख्या असलेल्या या गावात मुस्लिम, हिंदू, शीख, ख्रिश्चन यांसारख्या विविध धर्मांचे लोक शांततेत राहतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.