Vinod Dengale
देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या करीयरचा निर्णय घेणाऱ्या NEET-JEE सारख्या मोठ्या परीक्षा कोण घेत माहितेय का?
त्याच उत्तर आहे NTA. NTA ची स्थापना 2018 मध्ये करण्यात आली होती.
NTA म्हणजे National Testing Agency. ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाअंतर्गत काम करणारी परीक्षा संस्था आहे.
या संस्थेच्या स्थापनेमागचा उद्देश म्हणजे देशभरातील प्रवेश परीक्षा अधिक पारदर्शक आणि एकसमान पद्धतीने घेता याव्यात.
आज भारतातील सर्वात मोठ्या प्रवेश परीक्षा NTA घेते. यात NEET UG, JEE Main, CUET, UGC NET, CMAT आणि GPAT यांचा समावेश आहे.
या मोठ्या परीक्षा घेत असली तरी अनेकदा पेपर लीक वरून या संस्थेवर अनेक प्रश्नही उपस्थित झाले आहेत.
यातच आता पेपर लीकमुळे UG NEET 2026 रद्द झाल्यामुळे ही संस्था चर्चेत आली आहे.