Mansi Khambe
भारतात मान्सूनचे आगमन ही वर्षातील सर्वात उत्सुकतेने वाट पाहिली जाणारी हवामान घटना आहे. तो कडक उन्हापासून दिलासा देतो. देशभरातील शेतीसाठी पायाभरणी करतो.
Monsoon in India
ESakal
दरवर्षी, नैऋत्य मान्सून प्रथम अंदमान आणि निकोबार बेटांवर पोहोचतो आणि नंतर केरळच्या किनारपट्टीमार्गे मुख्य भारतात प्रवेश करतो.
Monsoon in India
ESakal
नैऋत्य मान्सून साधारणपणे दरवर्षी २० मे च्या सुमारास अंदमान आणि निकोबार बेटांवर प्रथम दाखल होतो, ज्यामुळे भारतातील मान्सून हंगामाची सुरुवात होते.
Monsoon in India
ESakal
साधारणपणे १ जूनपर्यंत मान्सून केरळच्या किनारपट्टीच्या भागात पोहोचतो. हिंद महासागरातून येणारे बाष्पयुक्त वारे पश्चिम घाटावर आदळतात.
Monsoon in India
ESakal
ज्यामुळे मुसळधार पाऊस पडतो. संपूर्ण भारतात पावसाळ्याची अधिकृत सुरुवात होते. केरळमध्ये प्रवेश केल्यानंतर भारताच्या भौगोलिक रचनेमुळे मान्सून दोन शाखांमध्ये विभागला जातो.
Monsoon in India
ESakal
अरबी समुद्राची शाखा आणि बंगालच्या उपसागराची शाखा. या दोन्ही शाखा वेगवेगळ्या दिशांना वाहतात.
Monsoon in India
ESakal
अरबी समुद्राची शाखा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरून वेगाने पुढे सरकत असून सुमारे ५ जूनपर्यंत कर्नाटक आणि गोव्यात १० जूनपर्यंत मुंबईत आणि जूनच्या मध्यापर्यंत गुजरात आणि मध्य प्रदेशात पोहोचेल.
Monsoon in India
ESakal
बंगालच्या उपसागराची शाखा सर्वप्रथम ५ जूनच्या सुमारास ईशान्य भारतात पोहोचते. यामध्ये आसाम आणि मेघालयचा समावेश आहे.
Monsoon in India
ESakal
त्यानंतर ती पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशच्या दिशेने पुढे सरकते. अखेरीस जून महिन्याच्या अखेरपर्यंत ती दिल्ली, हरियाणा आणि पंजाबमध्ये पोहोचते.
Monsoon in India
ESakal
पश्चिम राजस्थान हा सहसा भारतातील मान्सूनचे आगमन होणाऱ्या शेवटच्या प्रदेशांपैकी एक आहे. जयपूर आणि जैसलमेरसारख्या शहरांमध्ये साधारणपणे ५ जुलै ते १५ जुलै दरम्यान मान्सूनचे आगमन होते.
Monsoon in India
ESakal
Station Master & Yard Master Difference
ESakal