Mansi Khambe
मनी लाँडरिंग आणि बेकायदेशीर कमाईच्या बातम्यांमध्ये तुम्ही अनेकदा काळ्या पैशाचे नाव ऐकले असेल. नोटाबंदीच्या काळातही त्याची खूप चर्चा झाली होती.
पण तुम्ही रेड मनीबद्दल आणि पिंक मनीबद्दल ऐकले आहे का? जर तुम्ही ऐकले नसेल तर आज आम्ही तुम्हाला याचे उत्तर सांगतो.
काळा पैसा ज्याला ब्लॅक मनी असेही म्हणतात. तो असा पैसा आहे जो बेकायदेशीर मार्गांनी कमावला जातो आणि सरकारच्या नजरेपासून लपलेला असतो.
हा पैसा करचोरी, भ्रष्टाचार, फसवणूक, लाचखोरी किंवा इतर बेकायदेशीर कृत्यांमधून निर्माण होतो. काळा पैसा अनेकदा रोखीने व्यवहार केला जातो. ज्यामुळे त्याचा माग काढणे कठीण होते.
रेड मनी हा काळ्या पैशासारखाच बेकायदेशीर पैसा मानला जातो. परंतु तो विशेषतः गुन्हेगारी कारवायांमधून मिळवलेल्या पैशाशी जोडला जातो.
लाल रंग धोक्याचे प्रतीक आहे. तसाच तो समाज आणि अर्थव्यवस्थेसाठी धोक्याचे प्रतीक आहे. म्हणून रेड मनी असे नाव देण्यात आले आहे.
हा पैसा केवळ अर्थव्यवस्था कमकुवत करत नाही तर राष्ट्रीय सुरक्षेलाही धोका निर्माण करू शकतो.
तर पिंक मनी म्हणजे बेकायदेशीर अंमली पदार्थ, बेकायदेशीर जुगारातून कमावलेला पैसा. जुगारातून मिळवलेल्या पैशाला पिंक मनी असं म्हटलं जातं.