Payal Naik
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं तर जिंकलीच सोबतच त्याचं वैयक्तिक आयुष्यही प्रचंड चर्चेत राहिलं.
संजय याच्या ३०८ गर्लफ्रेंड्स होत्या. हे त्याचा बायोपिक 'संजू' मधून उघड झालं होतं.
तो काही बॉलिवूड अभिनेत्रींच्या देखील प्रेमात होता. त्याचं वैवाहिक जीवन खूप चढउतारांनी भरलेलं होतं
संजय आणि मान्यता यांची जोडी बी- टाऊनमध्ये खूप लोकप्रिय आहे. मान्यता त्याची तिसरी पत्नी आहे.
आज त्यांच्या लग्नाचा १७ वा वाढदिवस आहे. मात्र मान्यता संजयपेक्षा किती वर्षांनी लहान आहे ठाऊक आहे का?
मान्यता हिंदू नाही तर मुस्लिम कुटुंबात जन्माला आली. अनेकांना तिचं खरं नावही ठाऊक नाही.
मान्यता ही पती संजय पेक्षा खूप जास्त लहान आहे. मान्यता ही संजय दत्तपेक्षा तब्बल १९ वर्षांनी लहान आहे.
तिचं खरं नाव दिलनवाज शेख आहे. बॉलिवूडमध्ये आल्यानंतर तिने आपले नाव बदलून मान्यता ठेवल्याचं बोललं जातं.
त्यांनी ११ फेब्रुवारी २००८ मध्ये लग्न केले. दोघांनी लग्न केलं, तेव्हा मान्यता २९ वर्षांची तर संजय ५० वर्षांचा होता.
त्यांना शरण नावाचा मुलगा आणि इक्रा नावाची मुलगी आहे.
मला अनिल कपूरला किस करायला भाग पाडलं, २२ वर्षाने लहान अभिनेत्रीचा खुलासा