Mansi Khambe
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी नीट परीक्षेतील अनियमिततेमुळे 'कॉकरोच जनता पार्टी'च्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
Sonam Wangchuk Net Worth
ESakal
नीट परीक्षेतील अनियमिततेच्या विरोधात शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा आणि परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्याची मागणी करत सोनम वांगचुक दिल्लीतील जंतर-मंतर येथे बेमुदत उपोषणाला बसले आहेत.
Sonam Wangchuk Net Worth
ESakal
उपोषणाच्या २१ व्या दिवशी वांगचुक यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र त्यांच्या पत्नी गीतांजली जे. आंग्मो यांनी खासगी रुग्णालयात स्थलांतरित करण्याची परवानगी मागितली आहे.
Sonam Wangchuk Net Worth
ESakal
या प्रकरणामुळे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे नाव चर्चेत असून त्यांच्या कमाईचं साधन काय आहे? तसेच त्यांचे नेटवर्थ किती आहे, याबाबत अनेकांना प्रश्न पडले आहेत.
Sonam Wangchuk Net Worth
ESakal
सोनम वांगचुक यांची लडाखी अभियंता, शिक्षण सुधारक आणि नवोपक्रमधील संशोधक अशी ओळख आहे. त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी श्रीनगरमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक. पदवी प्राप्त केली आहे.
Sonam Wangchuk Net Worth
ESakal
वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, सोनम वांगचुक यांच्या कमाईचे अनेक मार्ग आहेत. त्यांचे स्वतःचं 'वांगचुक वर्ल्ड' (Wangchuk World) या नावाचे एक यूट्यूब चॅनेल आहे.
Sonam Wangchuk Net Worth
ESakal
या चॅनेलचे लाखो सबस्क्रायबर्स असून याद्वारे सोनम वांगचुक दरमहा ३ ते ७ लाख रुपयांपर्यंत कमाई करतात.
Sonam Wangchuk Net Worth
ESakal
इतकंच नाही तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्याख्यानं, परिषदा आणि प्रेरणादायी भाषणांसाठीही त्यांना मानधन दिले जाते.
Sonam Wangchuk Net Worth
ESakal
सोनम वांगचुक यांच्या नेटवर्थबाबत अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली नाही. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांची नेटवर्थ ७५ लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक असल्याची माहिती आहे.
Sonam Wangchuk Net Worth
ESakal
Gitanjali Angmo Education
ESakal