तज्ज्ञांच्या मते डाळी खाण्याची योग्य वेळ कोणती?

Anushka Tapshalkar

वर्ल्ड पल्स डे 2026

डाळी आणि कडधान्यांचे पोषणमूल्य, शाश्वत शेती आणि आरोग्यातील महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी वर्ल्ड पल्स डे साजरा केला जातो.

What is the Right Time to Eat Pulses

|

sakal

डाळी पोट फुगवतात का?

अनेकांना डाळ खाल्ल्यानंतर जडपणा, गॅस किंवा फुगण्याचा त्रास होतो; मात्र तज्ज्ञांच्या मते दोष डाळींचा नसून वेळ आणि पद्धतीचा असतो.

What is the Right Time to Eat Pulses

| sakal

डाळ खाण्याची सर्वोत्तम वेळ – दुपार

दुपारी पचनशक्ती सर्वाधिक सक्रिय असते. त्यामुळे डाळ, राजमा, चणे यांसारखी कडधान्ये लंचला खाल्ल्यास ती सहज पचतात.

What is the Right Time to Eat Pulses

|

sakal

रात्री डाळ का जड वाटते?

रात्री पचनक्रिया मंदावते. त्यामुळे राजमा, छोले, अख्ख्या डाळी उशिरा खाल्ल्यास गॅस आणि अस्वस्थता वाढू शकते.

What is the Right Time to Eat Pulses

|

sakal

रात्री कोणती डाळ चालेल?

मूग किंवा मसूरसारख्या हलक्या डाळी कमी प्रमाणात आणि झोपेच्या २–३ तास आधी घेतल्यास सहसा चालतात.

What is the Right Time to Eat Pulses

|

sakal

सकाळी डाळ खाणे योग्य आहे का?

सकाळी राजमा-चोले टाळलेले बरे. मात्र मूग डाळीचा चिल्ला किंवा थोडे अंकुर पचनसंवेदनशीलतेनुसार चालू शकतात.

What is the Right Time to Eat Pulses

| Sakal

भिजवणे आणि शिजवणे महत्त्वाचे

डाळी ६–८ तास भिजवल्याने अँटी-न्यूट्रिएंट्स कमी होतात. अंकुर काढणे आणि प्रेशर कुकिंग पचन सोपे करते.

Soak The Moong Dal Overnight | sakal

स्वयंपाकातील पारंपरिक मसाल्यांची ताकद

जिरे, हिंग, आलं, अजवाइन, हळद हे मसाले पचन एन्झाइम्स सक्रिय करतात आणि गॅस कमी करतात.

What is the Right Time to Eat Pulses

|

sakal

प्रमाण ठेवा, संतुलन ठेवा

डाळी आरोग्यदायी असल्या तरी प्रमाण महत्त्वाचे. भाजी, कोशिंबीर आणि भात/भाकरीसोबत संतुलित प्रमाणात घेतल्यास पचन सुधारते.

eat pulse | esakal

1 महिना भात बंद केल्याने शरीरात काय बदल होतात?

What Happens if You Stop Eating Rice for One Month

|

sakal

आणखी वाचा