ध्वजारोहण आणि ध्वजवंदन या दोन्हीमध्ये नेमका फरक काय?

Anushka Tapshalkar

राष्ट्रीय सण

राष्ट्रीय सणांमध्ये आपण ‘ध्वजारोहण’ आणि ‘ध्वजवंदन’ हे शब्द ऐकतो, मात्र दोन्हींचा अर्थ आणि वापर वेगळा आहे. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या विधींमधील हा महत्त्वाचा फरक प्रत्येक भारतीयाने समजून घेणे आवश्यक आहे.

ध्वजारोहण म्हणजे काय?

ध्वज खालील बाजूपासून वर उचलला जातो, यालाच ध्वजारोहण असे म्हणतात.

स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व

भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला, आणि त्या दिवसापासून दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान स्वातंत्र्यदिनी ध्वज फडकवतात.

ध्वजवंदन म्हणजे काय?

देशाच्या राष्ट्रपती किंवा नागरिकांनी राष्ट्रध्वजाला सन्मान देणे किंवा सलामी देणे म्हणजेच ध्वजवंदन होय.

प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व

26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो, जो संविधानाच्या अंमलबजावणीचे आणि देशाच्या एकतेचे प्रतीक आहे.

प्रजासत्ताक दिनी प्रमुख विधी

प्रजासत्ताक दिनी देशाचे राष्ट्रपती कर्तव्य पथावर राष्ट्रध्वजाचे ध्वजवंदन करतात. यावर्षी हे कार्य द्रोपदी मुर्मू यांनी पार पाडलं.

स्वातंत्र्यदिन vs प्रजासत्ताक दिन

स्वातंत्र्यदिनी देशाचे पंतप्रधान ध्वजारोहण करतात. तर प्रजासत्ताक दिनी देशाचे राष्ट्रपती राष्ट्रध्वजाचे ध्वजवंदन करतात.

Indian Flag | sakal

थोडक्यात फरक

ध्वजारोहण = झेंडा फडकवणे
ध्वजवंदन = झेंड्याला सन्मान देणे / सलामी

Indian Flag | sakal

तिरंगी टच, स्वादिष्ट फ्लेवर! प्रजासत्ताक दिनानिमित्त ट्राय करा 'हे' भन्नाट तिरंगी पदार्थ

Republic Day Special

|

sakal

आणखी वाचा