IMF म्हणजे काय? तो पाकिस्तानला कर्ज का देतो आणि हे पैसे येतात कुठून?

सकाळ वृत्तेसवा

IMF म्हणजे काय?

IMF म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्था. ही संस्था आर्थिक संकटात सापडलेल्या देशांना कर्ज देते आणि त्यांना सावरण्यास मदत करते.

IMF | Sakal

IMF पैसे कुठून आणतो?

IMF सदस्य देशांकडून "कोटा" या नावाने निधी उभारतो. प्रत्येक देशाची आर्थिक क्षमता, GDP, व्यापार यावर कोट्याची रक्कम ठरते.

IMF | Sakal

आणखी कुठून येतो पैसा?

IMF गरज पडल्यास विकसित देशांकडून कर्ज घेतो. याला NAB (New Arrangements to Borrow) म्हणतात. तसेच Bilateral Agreements द्वारेही पैसे उभारले जातात.

IMF | Sakal

IMF चे काम काय?

IMF सदस्य देशांच्या अर्थव्यवस्थेवर लक्ष ठेवतो. दरवर्षी रिपोर्ट जारी करतो आणि धोरण सुधारणा करण्यासाठी सल्ला देतो.

IMF | Sakal

IMF कर्ज देतो कसे?

IMF तीन प्रकारांनी कर्ज देतो –

Rapid Financing Arrangement

Extended Fund Facility

Stand-By Arrangements

IMF | Sakal

कर्जाच्या अटी काय असतात?

कधीकधी IMF कडून कर्ज मिळवण्यासाठी देशांना सबसिडी कमी करावी लागते, कर प्रणालीत सुधारणा करावी लागते आणि सरकारी खर्च कमी करावे लागतात.

IMF | Sakal

IMF फक्त पैसेच देतो का?

नाही, IMF सदस्य देशांच्या अधिकार्‍यांना प्रशिक्षण देतो. बँकिंग, टॅक्सेसन, डेटा गोळा करणे यावर टेक्निकल सहाय्यही करतो.

IMF | Sakal

IMF चे मोठे कर्जदार देश कोणते?

अर्जेन्टीना ($40.9B), युक्रेन, मिस्र, पाकिस्तान ($8.3B), कोलंबिया, बांगलादेश यांसारखे अनेक देश IMF चे मोठे कर्जदार आहेत.

IMF | Sakal

१९६५च्या युद्धात लाल बहादूर शास्त्रींनी RSS कडे केल होतं मदतीच आवाहन

Lal Bahadur Shastri and RSS | Sakal
येथे क्लिक करा