Anushka Tapshalkar
एक काळ असा होता, जेव्हा राज्यभरातील विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकण्यासाठी लातूरमध्ये येत होते. हीच सुरुवात होती लातूर पॅटर्नची!
१९८९ साली शाहू कॉलेजपासून सुरू झालेल्या अभ्यासपद्धतीचा उद्देश मुलांना गुणवत्ता यादीत आणणं! दिवाळीपूर्वी अभ्यासक्रम पूर्ण करणे, सराव परीक्षा, विशेष क्लासेस यावर भर.
शाहू महाविद्यालयाचे जे. एम. वाघमारे, शिवराज नाकाडे यांसारख्या शिक्षकांनी मिळून घातलेली शैक्षणिक क्रांती – लातूर पॅटर्न!
१९८९ ते १९९5 हा लातूर पॅटर्नचा सुवर्णकाळ. पुणे-मुंबईला टक्कर देत लातूरची मुलं राज्यभर झळकली.
१०–२० रुपयांच्या क्लासेसपासून गुणवत्ता यादीत स्थान मिळवणं – शिक्षणातली ही प्रामाणिकता आज दुर्मीळ!
२००० नंतर खासगी क्लासेस, वाढती फी, स्पर्धा... आणि लातूर ‘कोटा फॅक्टरी’सारखं होऊ लागलं.
दक्षिण भारतातून आलेले शिक्षक, गेस्ट लेक्चर्स, भरमसाठ फी... शिक्षणाचा हेतू हरवला आणि धंदा वाढला.
क्लासेसच्या स्पर्धेत अविनाश चव्हाण यांचा खून – आणि लातूर पॅटर्नवर रक्ताचा डाग.
स्पर्धा, बाजारूपणा आणि हिंसाचारामुळे मुलं इतर शहरांकडे वळली. लातूर पॅटर्नचं तेज मंदावलं.