Aarti Badade
शांत बैठकीत किंवा मिटिंगमध्ये पोटातून येणारा आवाज लाजीरवाणा वाटतो का? जाणून घ्या त्यामागचं कारण.
जेव्हा आपल्याला भूक लागते, तेव्हा शरीर एक संदेश पाठवतं – काहीतरी खा! म्हणूनच पोट 'बोलू' लागतं.
पोट आणि आतड्यांमधील स्नायू आकुंचन व प्रसरण करत राहतात. याच हालचालींना पेरिस्टॅलिसिस म्हणतात.
रिकामं पोट असताना पचनसंस्थेतील हवा, वायू आणि हालचाली यामुळे आवाज जास्त ऐकू येतो.
भूक लागल्यावर शरीर घरेलिन नावाचं हार्मोन तयार करतं. हे स्नायूंना जास्त हालचाल करायला भाग पाडतं.
घरेलिनमुळे पोटाचा आवाज वाढतो. तुम्ही जेवले नाहीत तर तो आवाज अधिक तीव्र होतो.
पोट भरल्यावर स्नायू शांत होतात, घरेलिनचं प्रमाण कमी होतं आणि आवाज आपोआप थांबतो.
पोट गुरगुरतंय म्हणजे शरीर तुम्हाला सांगतंय – "वेळ झालीय काहीतरी खायची!"