Anuradha Vipat
अभिनेते नाना पाटेकर यांनी देखील मुंबई सोडून गावी जाऊन राहण्याचा निर्णय घेतला आहे.
याबद्दल ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमात नाना पाटेकरांनी खुलासा केला आहे
‘वनवास’ चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी नाना पाटेकर या कार्यक्रमात आले होते
तेव्हा नाना पाटेकरांनी मुंबई सोडण्याचं कारण सांगितलं आहे .
नाना पाटेकर म्हणाले की, मी या व्यवसायातील नाही, मी गावाकडचा माणूस आहे.
पुढे नाना पाटेकर म्हणाले की,मी इकडे काम करतो, आणि परत गावात जातो. मी गाव-खेड्यात राहतो, आणि तिथेच राहणार, तिकडेच मला बरे वाटते...
पुढे नाना पाटेकर म्हणाले की, कधी कधी तर मला वाटते की, तर माझी चित्रपटात कारकीर्द झाली नसती, तर मी एक छोटेसे हॉटेल उघडले असते.