Sandip Kapde
ऑपरेशन सिंदूरनंतर अजित डोवाल चर्चेत आले आहेत. ते भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत.
ऑपरेशन सिंदूरनंतर अजित डोवाल पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. सध्या ते भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.
2014 मध्ये मोदी सरकार प्रथमच सत्तेत आल्यानंतर, 30 मे 2014 रोजी अजित डोवाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती झाली.
2019 मध्ये मोदी सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर, 3 जून 2019 रोजी अजित डोवाल यांची दुसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली.
यानंतर मोदी सरकारने अजित डोवाल यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदासोबतच कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिला, तर त्याआधी त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाला होता.
आता केंद्रात सलग तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार स्थापन झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास व्यक्त करत त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.
NSA होण्यापूर्वी अजित डोवाल इंटेलिजन्स ब्युरोचे (IB) प्रमुख होते. 1968 मध्ये ते आयपीएस म्हणून पोलिस सेवेत रुजू झाले. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रत्येक मोठा निर्णय अजित डोवाल यांच्या सल्ल्यानेच घेतला जातो.
1968 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अजित डोवाल यांनी केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील ASAP म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.
1972 मध्ये ते आयबीमध्ये रुजू झाले. ईशान्येत शांतता प्रस्थापित करण्याचे श्रेयही डोवाल यांना जाते.
डोवाल यांना 1988 मध्ये कीर्ती चक्राने सन्मानित करण्यात आले. त्याने अनेक वर्षे पाकिस्तानमध्ये गुप्तहेर एजंट म्हणूनही काम केले आहे.
अनेक वर्षे आयबीच्या ऑपरेशन्स विंगमध्ये काम केल्यानंतर त्यांची आयबीच्या संचालकपदी नियुक्ती झाली.
2014 मध्ये त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
'पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, अजित डोवाल यांना दरमहा 1,37,500 रुपये पगार दिला जातो. याशिवाय त्यांना पेन्शनही मिळते.