Sandip Kapde
भारतीय सैन्य दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानात आणि पीओकेमध्ये एअर स्ट्राइक केली आहे.
या ऑपरेशनमध्ये दहशतवाद्यांचे ठिकाणे नेस्तनाबूत करण्यात आली आहेत.
ANI ने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये हल्ल्याचे दृश्य स्पष्टपणे दिसून येते.
हे हल्ले भारताविरुद्ध पहलगाममध्ये घडवलेल्या दहशतवादी कारवायांचा बदला म्हणून करण्यात आले.
भारतीय सैन्याने निवडक दहशतवादी केंद्रांवर निशाणा साधला आहे.
पाकिस्तानी माध्यमांच्या मते जैश-ए-मोहम्मद आणि हिज्बुल मुजाहिदीनचे ट्रेनिंग सेंटर उद्ध्वस्त झाले आहेत.
मसूद अजहर आणि हाफिज सईद यांच्या अड्ड्यांवरही एअर स्ट्राईक करण्यात आला आहे.
बहावलपूरमधील जामी मस्जिद सुभानअल्लाहवर देखील हल्ला झाला आहे.
ही मस्जिद जैश-ए-मोहम्मदचा मुख्यालय मानली जाते.
कोटली भागात हिजबुलचे ट्रेनिंग सेंटर ध्वस्त करण्यात आले आहे.
मुजफ्फराबादमध्ये लष्करचा ट्रेनिंग सेंटर आणि हिजबुलचे मुख्यालय आहे.
भारताने ९ ठिकाणांवर हल्ला करून त्यांना निष्क्रीय केले आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार ही कारवाई संयम राखून करण्यात आली.
कोणत्याही पाकिस्तानी सैन्य ठिकाणाला लक्ष्य करण्यात आलेले नाही.
भारताने हल्ल्याचे ठिकाण निवडताना जबरदस्त काळजी घेतली आहे.
ऑपरेशन सिंदूर हे त्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठीचे नियोजनबद्ध पाऊल होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.