पाणस्थळ जागी आढळणारा शिकारी पक्षी; जाणून घ्या काय आहे 'ससाणा'ची खासियत?

सकाळ डिजिटल टीम

दलदल ससाणा

दलदल ससाणा (Eurasian Marsh Harrier), पाणघार किंवा दलदल भोवत्या हा पाणस्थळ जागी आढळणारा शिकारी पक्षी आहे.

Eurasian Marsh Harrier Bird

पाणस्थळ जागी आढळणारा शिकारी पक्षी

हा पक्षी पश्चिम युरोप व आफ्रिकेत राहतो. मात्र, हिवाळ्यात भारत व अन्य उष्णकटिबंधीय देशांमध्ये येतो.

Eurasian Marsh Harrier Bird

सस्तन प्राण्यांची करतो शिकार

५५ ते ६० सेंटिमीटर आकाराचा हा मोठा पक्षी बेडूक, मासे, छोटे पक्षी, छोटे सस्तन प्राणी यांची शिकार करून खातो.

Eurasian Marsh Harrier Bird

वजन ६०० ते ७०० ग्रॅम

याच्या पंखांचा विस्तार १३० ते १४० सेंटिमीटर इतका प्रचंड असतो, तर वजन ६०० ते ७०० ग्रॅम इतके असू शकते.

Eurasian Marsh Harrier Bird

नर आणि मादीमध्ये असतो फरक

या प्रजातीमध्ये रंगावरून नर आणि मादीमध्ये फरक सांगता येतो. नर गडद तपकिरी वर्णाचा; डोके, छाती व मान फिकट तांबूस.

Eurasian Marsh Harrier Bird

पंख-शेपटीवर करडी पिसे

पंख व शेपटीवर करडी पिसे, पंखांची टोके काळी अशा रंगांचा असतो.

Eurasian Marsh Harrier Bird

चॉकलेटी तपकिरी वर्ण

तर मादी एकंदरीत चॉकलेटी तपकिरी वर्ण, टोपी, घसा व पंखांची समोरील बाजू खांद्याजवळ फिकट पिवळसर असते.

Eurasian Marsh Harrier Bird

शिकारी पक्षी

दलदल ससाणा पाणघार किंवा दलदल भोवत्या हा पाणस्थळ जागी आढळणारा शिकारी पक्षी आहे.

Eurasian Marsh Harrier Bird

पक्षी ५ ते ८ अंडी देतो

जोडी मार्च ते मे या दरम्यान ५ ते ८ अंडी देऊन त्यांचे संगोपन करते, अशी माहिती पक्षिमित्र तेजस भिडे यांनी दिली.

'बेलनची फटाकडी' पक्षाची काय आहे खासियत; सांगलीत आढळतात तीन उपप्रजाती

Baillons Crake Bird | esakal
येथे क्लिक करा