Sandip Kapde
छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक ठिकाणी विहिरींचे बांधकाम करून घेतले होते.
त्यांच्या मातोश्री जिजाबाई पाचाड येथे राहत असत.
जिजाऊसाठी खास वाडा बांधण्यात आला होता.
या वाड्यात दोन खास विहिरी बांधल्या होत्या.
यापैकी एक विहीर 'तक्क्याची विहीर' म्हणून ओळखली जाते.
या विहिरीवर बसण्यासारखा एक ‘तक्का’ तयार करण्यात आला होता.e
या बांधणीमुळे ही विहीर ‘तक्क्याची विहीर’ म्हणून प्रसिद्ध झाली.
शिवकालीन विहिरींचा हा वारसा पुढे सातारा राजघराण्यातील वीरबाईंनी पुढे नेला.
वीरबाईंनी नागेवाडीजवळ एक मोठी विहीर बांधली.
त्या विहिरीला 'बारा मोटांची विहीर' असे म्हटले जाते.
या विहिरीवरही शिवकाळात पाहिल्या गेलेल्या तक्क्याची रचना आहे.
ही ऐतिहासिक तक्क्याची विहीर आजही शाबूत असून इतिहासाची साक्ष देते.