सकाळ डिजिटल टीम
‘जर’ म्हणजे सोने आणि ‘दोजी’ म्हणजे भरतकाम सोन्याच्या तारांनी केलेली कलाकारी.
जरदोजीची कला भारतात मुघल सम्राटांच्या काळात विशेष प्रसिद्ध झाली.
शाही पोशाखांचा हा अविभाज्य भाग राजे-महाराजे आणि नवाबांच्या पोशाखात जरदोजीचा वापर प्रतिष्ठेचं प्रतीक मानले जात असे.
सोनं, चांदी, आणि तांब्याच्या तारांचा वापर केला जातो. या कलेमध्ये पारंपरिक पद्धतीने धातूंच्या तारांनी नक्षी उभारली जाते.
हैदराबाद, लखनौ, दिल्ली जरदोजीचे केंद्र आहे . या शहरांत आजही ही पारंपरिक कला जीवंत ठेवली जाते.
ब्रायडल ड्रेस, शेरवानी, दुपट्टा यामध्ये जरदोजी भरतकामाची खास मागणी असते.
प्रत्येक नक्षीकाम तासंतास मेहनत घेऊन तयार केलं जातं म्हणून ती अनमोल असते.
आजची फॅशन जरदोजीला नव्याने स्वीकारते पारंपरिकतेतून ट्रेंड तयार होतोय.