Anushka Tapshalkar
पुरुष जरी प्रेम शोधत असले तरी त्यांना सर्वात जास्त “भावनिक स्पेस” हवी असते. त्यांना सतत बांधून ठेवणं नव्हे, तर स्वतःचा श्वास घेता येईल अशी जागा हवी असते.
“मला थोडं एकटं राहू दे” ही त्यांची गरज असते, पण एकटेपणा नाही. त्यांना वेळोवेळी स्वतःसोबत राहायला आवडतं, पण नातं तुटावं असं त्यांना कधीच वाटत नाही.
त्यांना नातं निवडता आलं पाहिजे, जबरदस्तीने अडकलेलं वाटू नये. जर त्यांना वाटलं की ते स्वतःच्या इच्छेने नात्यात आहेत, तर ते अधिक गुंततात.
Relationship Tips
Sakal
स्वातंत्र्य हे त्यांच्यासाठी मानसिक भावना असते, फक्त कृती नाही. त्यांना बाहेर जाण्याची मोकळीकपेक्षा “मला निवडायचं आहे” ही भावना जास्त महत्त्वाची असते.
त्यांना सतत बदलण्याचा प्रयत्न नको असतो, स्वीकार हवा असतो. जसा आहे तसा स्वीकार मिळाला, तर ते अधिक स्थिर आणि निष्ठावान राहतात.
Relationship Tips
Sakal
पुरुषांसाठी ‘आदर’ (Respect) हे प्रेमापेक्षा खोल असतो. त्यांच्या निर्णयांवर विश्वास ठेवणं आणि त्यांना कमी लेखणं टाळणं हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं.
नात्यात स्वातंत्र्य आणि आदर मिळाला, तर ते स्वतःहून नातं जपतात. त्यांना मोठे गिफ्ट्सपेक्षा ही भावनिक समज अधिक महत्त्वाची वाटते.
Relationship
sakal