Sandip Kapde
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज ५७ वा वाढदिवस आहे.
राज ठाकरे नॉनव्हेजचे पक्के शौकीन आहेत, त्यांनी स्वतः म्हटलं आहे की, मला...
राज ठाकरे हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे नेहमीच चर्चेत असतात.
आजही तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियता तशीच टिकून आहे.
राज ठाकरेंच्या अनेक खासगी आणि सार्वजनिक गोष्टींची नेहमीच चर्चा होत असते.
व्यंगचित्र, राजकारणाबरोबरच त्यांना चित्रपट आणि फोटोग्राफीचीही विशेष आवड आहे.
तर जेवणाच्या बाबतीत त्यांना नक्की काय आवडतं, याचा खुलासा एका मुलाखतीत झाला होता.
त्यांच्या आवडीनुसार हे लक्षात येतं की, ते नॉनव्हेजचे कट्टर प्रेमी आहेत.
राज ठाकरे यांना त्यांच्या आईच्या हातचं कोळंबीचं कालवण अतिशय प्रिय आहे.
त्यांच्या आईच्या सांगण्यानुसार, राज ठाकरेंना खिमा पॅटीस खूपच आवडतात.
बोंबिलची भजी देखील त्यांच्या आवडत्या पदार्थांमध्ये मोडते.
त्यांच्या खाद्यपसंतीमधून त्यांच्या साधेपणाचा आणि घरच्या चविचा प्रभाव जाणवतो.