सकाळ डिजिटल टीम
पावसाळ्यामध्ये योग्य आहार न घेतल्यास आरोग्याच्या अनेक तक्रारी निर्माण होऊ शकतात. या दिवसात खाण्यापिण्याची योग्य काळजी घ्यावी लागते. या दिवसात काय खाऊ नये याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
वांग्यामध्ये अल्कालोइड्स सारखे अनेक केमिकल्स असतात. ज्यामुळे एलर्जी होऊ शकते. त्यामुळे पावसाळ्यात वांगं खाऊ नये.
पावसाळ्यात फ्रेश दही खावे.no मात्र आंबट दही खाऊ नये.Esakal
या ऋतूमध्ये दूध, पनीर आदी प्रोटीनयुक्त डेअरी प्रोडक्ट कमी खावेत.
या ऋतूमध्ये व्यक्तीची पचनक्रिया मंदावत असते. मांसाहार पचायलाही वेळ लागतो. त्यामुळे मांसाहाराचे सेवन कमी करावे.
पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्यांवर किटक चिकटतात. ज्यामुळे आरोग्याला हानी पोहचते.
पावसातील पाण्यामुळे डास, माश्या याचे प्रमाण वाढते. अशावेळी उघड्यावरील ज्यूस पिल्यास किंवा फळे खाल्यास टायफॉइड, उलटी, जुलाब होण्याचा धोका संभावतो.