खानच्या भेटीला जाताना शिवरायांनी कोणता पोशाख घातला होता? कशी लपवली होती शस्त्रे ?

सूरज यादव

प्रतापगड

प्रतापगडाच्या पायथ्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझलखानाची भेट १० नोव्हेंबर १६५९ रोजी झाली होती.

Shivaji Maharaj Afzal Khan

|

Esakal

अफझलखान भेट

स्वराज्यावर चालून आलेल्या अफझल खानाने भेटीवेळी कपटाने वार करण्याचा प्रयत्न केला. पण शिवरायांनी वाघनखांनी त्याचा वध केला.

Shivaji Maharaj Afzal Khan

|

Esakal

प्रतापगड लढाई

अफझलखानाच्या वधामुळे मराठ्यांनी आदिलशहाचा प्रतापगडच्या लढाईत पराभव केला. यानंतर मराठा साम्राज्याचा पाया आणखी भक्कम झाला.

Pratapgadh

|

Esakal

भेटीचं वर्णन

छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझल खान यांच्या भेटीच्या तयारीचे वर्णन अनेक ऐतिहासिक दस्ताऐवजात आढळतं.

Shivaji Maharaj

|

Esakal

शिवरायांचा पोषाख

शिवाजी महाराजांनी अफझलखानाच्या भेटीसाठी जाताना खास असा पोषाख केला होता.अंगात कवच घातले त्यावर जरीची कुडती घातली.

Shivaji Maharaj

|

Esakal

वाघनखं

शिवरायांनी डोक्याला मंदिल बांधलेलं तर हातात एक बिचवा आणि वाघनखं चढवली होती.याच वाघनखांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला होता.

WaghNakh

|

Esakal

जिवा महाला

छत्रपती शिवाजी महाराजांसोबत सरदार जिवा महाला होते. त्यांच्याकडे एक पट्टा, फिरंग आणि ढाल होती.

Shivaji Maharaj

|

Esakal

खानाचा पोषाख

अफझलखान दगाफटका करण्याच्या इराद्यानेच आला होता. त्यानं गुप्त कट्यार कंबरेत खोवली होती. शिवाय तलवारही जवळ होती.

Afzal Khan

|

Esakal

पुण्यातील या ऐतिहासिक किल्ल्याला आहे हजारो वर्षांचा इतिहास

Mumbai | sakal
इथं क्लिक करा