Saisimran Ghashi
श्रावण हा पवित्र महिना सुरू झाला आहे यामध्ये सोमवारी उपवास केला जातो आणि महादेवाची पूजा केली जाते.
या श्रावणाच्या महिन्यामध्ये कोणत्या गोष्टी खाऊ नयेत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
श्रावणाच्या महिन्यात लसूण आणि कांद्याचे सेवन वर्ष मानले जाते सोबतच मांसाहार देखील करू नये.
असे मानले जाते की हे पदार्थ शरीरात उष्णता निर्माण करतात ज्यामुळे व्यक्तीच्या मनात भोगवासणा आणि आकर्षण निर्माण होते.
या भावना महादेवाच्या भक्तीमध्ये बाधा निर्माण करतात हेच कारण आहे की श्रावणात तामसिक भोजन करू नये.
श्रावणात हिरव्या पालेभाज्या देखील खाणे योग्य मानले जात नाही कारण त्यावर बॅक्टेरिया किंवा व्हायरस असण्याचा धोका असतो.
वातावरणात जर बॅक्टेरिया असलेल्या भाजीपाल्यांची आपण सेवन केल्यास शरीरासाठी नुकसान दायक ठरू शकते.
श्रावण महिन्यामध्ये शिवभक्तांद्वारे शिवलिंगावर कच्चे दूध अर्पण केले जाते त्यामुळे या महिन्यात दुधाचे सेवन देखील वर्ज्य मानले जाते.
गाय आणि म्हैस श्रावणामध्ये करत असताना अनेक किडे आणि बॅक्टेरिया असलेले गवत खाऊ शकते त्यामुळे हे दूध दूषित होण्याची शक्यता देखील असते.
श्रावण महिन्यात दही आणि कढी चे सेवन देखील योग्य मानले जात नाही त्यामुळे दुधाचे पदार्थ खाणे टाळावे.
ही माहिती धार्मिक मान्यतेवर तसेच काही शास्त्रीय कारणांवर आधारित आहे आम्ही याची पुष्टी करत नाही.