Anushka Tapshalkar
हिमोग्लोबिन हे रक्तातील एक प्रथिन आहे जे शरीरातील ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करतं.
हिमोग्लोबिनाची कमतरता असल्यास शरीराला ऑक्सिजन कमी मिळतो. ज्यामुळे थकवा, अशक्तपणा आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
परंतु योग्य उपाय करून हिमोग्लोबिनची शरीरातील पातळी वाढवता येते आणि त्याच्या कमतरतेमुळे होणाऱ्या अयोग्य समस्या टाळत येतात.
आहारात लोहयुक्त पदार्थांचा समावेश करा. गूळ व खोबरे यामध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असते.
लोखंडी तवा व लोखंडी पळी कायम वापरा, त्यातूनही लोह शरीरात जाते.
जेवणाआधी व जेवणानंतर एक तास चहा किंवा कॉफी पिऊ नका; त्याने लोहाचे पचन खूप कमी होते.
उकडीचा किंवा हातसडीचा तांदूळ, काळे खजूर, काळ्या मनुका, अंजीर, अळीव व नाचणीची पेज यांनी देखील रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढते.
शरीरातील हिमोग्लोबिनचे सर्वसाधारण प्रमाण महिलांसाठी 12 ते 14 ग्रॅम% आणि पुरुषांसाठी 14 ते 16 ग्रॅम% असावे.