Mansi Khambe
दिवाळी म्हटलं की लाडू, चिवडा, करंजी आणि चकली यांची आठवण हमखास येते. चकली हा विशेषकरून दीपावलीमध्ये केला जाणारा एक मराठी खाद्यपदार्थ आहे.
गोलाकार वळणांचा आकार, कुरकुरीत पोत आणि मसालेदार चव यामुळे चकली लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना आवडते. सणासुदीच्या काळात घरोघरी चकली बनवली जाते, तसेच ती बाजारातही सहज उपलब्ध असते.
चकली पाडत असताना सोऱ्यातून मधेच तुटायला लागली, तर सोऱ्यातून गोळा बाहेर काढून पाण्याचा हात लावून पुन्हा चांगला मळून सोऱ्यात घालावा आणि मग चकल्या पाडाव्यात.
चकली पाडताना छान काटेदार दिसत नसेल, तर पाणी जास्त झाले आहे असे समजावे. अशा वेळी सोऱ्यातून गोळा बाहेर काढून त्यात एक-दोन चमचे भाजणीचे पीठ घालून परत चांगले मळून मग चकल्या कराव्यात.
चकली थोड्यावेळाने मऊ पडण्याची कारणे म्हणजे चकली मळताना पाणी जास्त घालणे, चकली तळताना घाई किंवा मोठ्या विस्तवावर तळणे आणि चकली पूर्ण बुडबुडे येईपर्यंत तळली गेली नसेल.
चकली खुसखुशीत होत नाही असे दिसल्यास कढईमधील दोन चमचे गरम तेल पिठात घालून परत गोळा मळून घ्यावा. मग चकल्या छान कुरकुरीत होतील.
तेल चांगले तापल्यावर त्यात चकल्या घालाव्यात, नाहीतर त्या विरघळून तेलात खूप बुडबुडे येतात व फेस होतो. अशा वेळी दुसऱ्या कढईवर कापड ठेवून त्यामध्ये तेल गाळून घ्यावे.
चकली कुरकुरीत होण्यासाठी भाजणीचे योग्य प्रमाण, पिठाचा योग्य मऊपणा आणि तेलाचे तापमान महत्त्वाचे असते.
चकली तळल्यानंतर ती पूर्णपणे थंड होऊ द्यावी. त्यानंतर हवाबंद डब्यात साठवावी. चकलीमध्ये ओलावा गेल्यास तिचा कुरकुरीतपणा कमी होऊ शकतो.
Movie Theaters Seats Colour
ESakal