Aarti Badade
चपाती, आमटी, भात, आणि भाजी दुपारच्या जेवणात असतात. मात्र, चपाती आणि भाताचे प्रमाण कमी करता येऊ शकते आणि अधिक प्रथिने असलेले पदार्थ समाविष्ट केले जाऊ शकतात.
प्रथिने मिळवण्यासाठी मासे, चिकन, अंडी, पनीर, छोले, राजमा, मटार यांचा समावेश करावा. पण लाल मांस खाण्याचे फायदे नाहीत, असे डॉ. मोहन सांगतात.
एक चांगले जेवण बनवण्यासाठी वाटीभर भाज्यांचे सलाड, वाटीभर भात, भाज्या, आमटी, पालेभाज्या आणि दही यांचा समावेश करा. चपाती/भाताचे प्रमाण कमी करा. दोन पोळ्या पुरेशा असतात.
ज्वारी, बाजरी, राळं, नाचणी, बर्टी यांचा समावेश जेवणात केला जाऊ शकतो.
द्विदल धान्ये (जसे की हरभरे, मटार), फ्लॉवर, कोबी यांचा आहारात असणे आवश्यक आहे.
ताटात प्रोटीनयुक्त पदार्थ जसे चिकन, अंडी, किंवा मासे असावे.
संध्याकाळी उकडलेले हरभरे, स्वीट कॉर्न, हिरवे मुग, मखाणे, सोया चंक्स खाऊ शकतात.