Saisimran Ghashi
सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विलमोर 9 महिने अंतराळात राहून मार्चला पृथ्वीवर परतले.
त्यांच्या पृथ्वीवर परतीनंतर अंतराळ वीरांच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली जात होती.
आता तब्बल 20 दिवसांनंतर या अंतराळवीरांनी पत्रकार परिषदेत अनेक खुलासे केलेत.
सुनीता विल्यम्सनी अंतराळतील त्यांचे अनुभव जगाला सांगितले.
सुनीता विल्यम्सनी पृथ्वीवर परत आल्यावर सगळ्यात पहिले काय खाल्ले याचा खुलासा त्यांनी केलाय.
जेवणाबद्दल बोलताना सुनीता म्हणाला की जेवण ही अशी गोष्ट आहे जी त्यांना नेहमीच घराची आठवण करून देते.
पृथ्वीवर परत आल्यानंतर सुनीता विल्यम्सनी सर्वांत पहिले ग्रील्ड चीज सँडविच खाल्ले होते.
सुनीता विलियम्सनी अवकाशातून भारत कसा दिसतो? याचे देखील उत्तर दिले.
त्या म्हणाल्या अवकाशातून भारत खूपच अत्भूत दिसतो.