Monika Shinde
उन्हाळा सुरु झाला कि अनेकांच्या नाकातून रक्तस्त्राव होतो. ही समस्या सामान्य आहे.
उन्हाळ्यात मुलांना शाळेना सुट्ट्या असतात. यामुळे मुलांचे मस्ती मजा करण्याचे दिवस असतात.
मुलं खेळताना अनेक वेळा नाकातून रक्त येऊ शकते. याबाबत काय करावं? जाणून घ्या
अनेक वेळा मुलं खेळताना नाकातून रक्त येऊ लागते. यावेळी घाबरून जाऊ नका. हे साधारणतः जास्त धक्का न झाल्यास गंभीर नसते.
जर नाकातून रक्त येत असेल तर डोकं खाली वाकवून डोक्यावर पाणी टाका. याने रक्त स्त्राव कमी होण्यास मदत होते आणि डोकं थंड होते.
नाकातून रक्त येत असल्यास, मुलाचे नाक हलकेच १० ते १५ सेकंदासाठी दाबून ठेवा. याने रक्तस्त्राव थांबण्यास मदत होते.
जर नाकातून रक्त येत असेल तर मुलाला ताबडतोब नाक वर करण्यास सांगितले पाहिजे. यामुळे रक्त वाहिन्यांमध्ये दाब कमी होईल.