कार्तिक पुजारी
नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये शीतकडा येथे धबधबा पाहायला गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला होता. ट्रेक लिडरच्या अनुभवामुळे सुदैवाने फारशी हानी झालेली नाही.
कोणी मधमाशांच्या अधिवासात गेलं अन् त्यांना आपल्याला धोका आहे असं वाटलं तर त्यावेळी मधमाशा हल्ला करतात
यासंदर्भात मधमाशांनी हल्ला केल्यास काय करावे हे आपण जाणून घेऊया
तज्त्रांच्या सल्ल्यानुसार, मधमाशांनी आपल्यावर हल्ला केला अन् आपल्याला दूर पळणे शक्य नसेल तर आपण काहीही हालचाल करायची नाही.
जमिनीवर पडून राहायचं. त्यांना हातांनी दूर करण्याचा प्रयत्न देखील करायचा नाही, कारण असं केल्याने त्यांना आपल्यावर हल्ला झाल्यासारखं वाटतं
त्यांना धोका आहे असं वाटलं की त्या डंख मारतात, याशिवाय मधमाशा डंख मारलेल्या ठिकाणी गंध सोडतात
याच ठिकाणी इतर माशा येऊन डंख मारतात. त्यामुळे एका माशीने डंख मारल्यानंतर त्याठिकाणी पाला चोळायला हवा. जेणेकरून गंध निघून जाईल