एकटे असताना हार्ट अटॅक आल्यावर काय करायचं?

Anushka Tapshalkar

हार्ट अटॅक

हार्ट अटॅक शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि चरबी जमा होऊन धमन्यांमध्ये प्लॅक तयार झाल्यामुळे होतो, जे हृदयाला रक्तपुरवठा कमी करते आणि स्नायूंना नुकसान पोहोचवते. सतत छातीत दुखणे किंवा दाब जाणवणे हा हार्ट अटॅकचा प्राथमिक इशारा असू शकतो.

Heart Attack

|

sakal

एकटे असताना हार्ट अटॅक

हार्ट अटॅक आलेल्या वेळी एकटे असणं खूप भयानक असू शकतं, त्यामुळे मदत येईपर्यंत योग्य पावलं उचलणं महत्त्वाचं आहे. लगेच वैद्यकीय मदत घेणं पुढचे गंभीर नुकसान टाळू शकते.

Alone in Heart Attack

|

sakal

त्वरित आपत्कालीन सेवा कॉल करा

ताबडतोब 108 किंवा आपल्या परिसरातील आपत्कालीन क्रमांकावर कॉल करा. आपली स्थिती ऑपरेटरला सांगा आणि त्यांच्या सूचनांचे पालन करा.

Call the Emergency Helpline Number

|

sakal

अ‍ॅस्पिरिन घ्या

लक्षणे दिसताच एक गोळी चघळून खा. डॉक्टरांचे म्हणणे आहे की अ‍ॅस्पिरिन रक्त पातळ करते आणि हृदयविकाराची तीव्रता कमी करते.

Take Aspirin

|

sakal

विश्रांती घ्या

ताबडतोब आरामदायी स्थितीत बसा. जर चक्कर येत असेल तर डाव्या बाजूला झोपा आणि पाय वाकवून ठेवा. हे हृदयातील रक्त प्रवाह सुधारण्यास मदत करते.

Take Rest

|

sakal

कोणालातरी कॉल करा

डॉक्टर किंवा एम्बुलन्स येईपर्यंत तुम्हाला आधार देण्यासाठी मित्र, कुटुंबीय किंवा शेजारी यांना फोन करा.

Call Your Closed Ones

|

sakal

शांत राहा

लांब आणि स्थिर श्वास घ्या. घाबरू नका; मदत लवकरच पोहोचेल.

Keep Calm

|

sakal

काहीही खाऊ किंवा पिऊ नका

खाणे-पिणे टाळा, कारण यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनू शकते.

Avoid Eating & Drinking

|

sakal

शरीरातील मॅग्नेशियमची कमतरता या उपायांनी करा पूर्ण!

Magnesium Deficiency | sakal
आणखी वाचा