घराबाहेर पडताना मुंगूस दिसलं तर काय करावं?

संतोष कानडे

शुभ संकेत

भारतीय लोकसंस्कृती आणि पारंपरिक समजुतींनुसार मुंगूस दिसणे हे कामात यश मिळण्याचे आणि आर्थिक समृद्धीचे शुभ प्रतीक मानले जाते.

घाबरू नका

मात्र याला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही. घराबाहेर पडताना मुंगूस दिसल्यास लगेच घाबरून जाऊ नका किंवा त्याला हुसकावण्यासाठी गोंधळ घालू नका.

नैसर्गिक हालचाली

मुंगूस हा अत्यंत चपळ आणि स्वतःच्या मार्गाने जाणारा प्राणी असल्याने त्याला शांतपणे त्याचा रस्ता ओलांडू द्या.

सुरक्षित अंतर

कोणत्याही वन्यजीवाप्रमाणे मुंगसापासूनही ठरावीक अंतर ठेवा, जेणेकरून त्याला स्वतःवर धोका वाटणार नाही.

पाठलाग

मुंगूस कुठे लपतो किंवा कुठे जातो हे पाहण्यासाठी त्याच्या मागे जाणे किंवा त्याला डिवचणे टाळावे.

सकारात्मक विचार

प्रवासाला निघताना मुंगूस दिसल्यास मनात कोणताही संशय किंवा भीती न बाळगता पुढे जाणं आवश्यक आहे.

साप

मुंगूस हा साप, विंचू आणि कीटकांची शिकार करतो; त्यामुळे तो परिसरात दिसणे हे घराभोवती विषारी जीव नसल्याचे एक नैसर्गिक लक्षण मानले जाते.

पाळीव प्राणी

तुमच्यासोबत पाळीव कुत्रा किंवा मांजर असल्यास त्यांना मुंगसावर धावून जाण्यापासून आवरून धरा.

संरक्षण

वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार मुंगसाला कोणतीही इजा करणे किंवा मारणे हा गुन्हा असल्याने त्याला कोणतीही इजा करू नका.

अस्वल मागे लागलं तर माणसाला गाठू शकतं का?

<strong>येथे क्लिक करा</strong>