जंगलात अचानक वाघ समोर आल्यास काय करावे?

संतोष कानडे

वाघ

जंगलात अचानक वाघ समोर आल्यास सर्वप्रथम घाबरून धावू नका आणि शांत राहण्याचा प्रयत्न करा.

सुरक्षित अंतर

वाघाकडे लक्ष ठेवा आणि त्याच्यापासून सुरक्षित अंतर राखण्याचा प्रयत्न करा.

हालचाल

वाघाकडे पाठ फिरवून पळू नका, कारण अचानक हालचालींमुळे परिस्थिती बिघडू शकते.

स्पर्श

वाघाच्या जवळ जाण्याचा, त्याला स्पर्श करण्याचा किंवा त्याचा फोटो काढण्याचा प्रयत्न करू नका.

दगड-काठ्या

वाघाला चिथावू नका, ओरडू नका आणि त्याच्यावर दगड किंवा काठ्या फेकू नका.

आक्रमक हालचाली

वाघाला पळवून लावण्यासाठी त्याच्या दिशेने धावू नका किंवा आक्रमक हालचाली करू नका.

सावध

वाघाला पळण्यासाठी मोकळी वाट द्या आणि त्याच्या हालचालींचा अंदाज घेऊन सावध राहा.

शांतपणा

शक्य असल्यास शांतपणे मागे सरका.. मात्र वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवा.

हालचाली टाळा

वाघ तुमच्या दिशेने येत असल्यास त्याला जवळ जाण्याचे कारण देणाऱ्या हालचाली टाळा आणि स्थानिक वनविभागाच्या सूचनांना प्राधान्य द्या.

वनविभाग

सुरक्षित ठिकाणी पोहोचल्यानंतर वनविभागाला घटनेची माहिती द्या; जंगलात फिरताना नेहमी अधिकृत मार्गदर्शकाच्या सूचनांचे पालन करा.

शिकार जिवंत ठेवूनच खाणारा जंगलातला क्रूर प्राणी

<strong>येथे क्लिक करा</strong>