पुजा बोनकिले
प्रथम काही दिवस म्हणजे साधारणतः दोन आठवडे विश्रांती घ्यावी, त्यानंतर जमेल, सोसवेल तेवढे थोडे थोडे हिंडणे, फिरणे सुरू करावे. मात्र हृदयावर ताण येईल अशा गोष्टी निश्चित टाळाव्यात.
आहार पचावयास हलका, ताजा व सात्त्विक असावा. तेलकट, मसालेदार तसेच चवळी, पावटा, आदी वातवर्धक रुक्ष पदार्थ खाणे टाळावे.
अंडे खाऊ नये. इतर मांसाहारही शक्यतो करू नये किंवा अगदीच मांसाहार करायचाच असल्यास केवळ मांसरस म्हणजे सूप घ्यावे.
कच्चे मीठ खाऊ नये म्हणजे वरून मीठ घ्यायची सवय नसावी. तसेच खारट अन्नपदार्थ खाणे टाळावे.
salt
पोटाला तडस लागेपर्यंत जेवू नये. रात्री उशिरा व जड जेवण करू नये.
जेवणानंतर, विशेषतः दुपारच्या जेवणानंतर विश्रांती घ्यावी. विश्रांती याचा अर्थ झोप नव्हे, तर जेवणानंतर आरामखुर्चीत बसावे, किंवा झोप येणार नाही अशा बेताने वामकुक्षी करावी. जेवणानंतर लगेच फिरायला जाणे, प्रवास करणे, किंवा जोरजोराने बोलणे इत्यादी थकायला लावणाऱ्या गोष्टी पूर्ण टाळाव्यात.
आहार व आचरणामध्ये नियमितता आणावी, रात्री पुरेसे तास व योग्य वेळी झोपून योग्य वेळी उठावे.
diet
सुरूवातीला घरातल्या घरात किंवा गच्चीत वगैरे चालावे. हळूहळू चालण्याची क्षमता वाढली की मग बागेत, समुद्रावर वगैरे ठिकाणी कमीत कमी 30-40 मिनिटे नियमित चालण्याची सवय ठेवावी.
हृदय हे मनाचे स्थान असल्याने मन प्रसन्न, शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. धसका बसेल, भीती वाटेल असे प्रसंग टाळावेत. विशेषतः अशा प्रकारचे वाचन, टीव्हीवरील मालिका वगैरे मुळीच पाहू नयेत.
हृदय ओजाचेही स्थान असल्याने ओजाला शक्ति मिळेल अशी आहारद्रव्ये सेवन करावीत. उदा. दूध, घरी बनवलेले साजूक तूप, घरी बनवलेले ताजे लोणी-खडीसाखर, रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम, अशा पौष्टिक गोष्टींचा आहारात समावेश असू द्यावा.
धूम्रपान पूर्ण बंद करावे, तंबाखू खाऊ नये.
hand baggage
Sakal