शरीरात रक्त वाढीसाठी कोणते पदार्थ खावेत?

Monika Shinde

अ‍ॅनिमिया

शरीरात रक्त कमी होणे म्हणजे अ‍ॅनिमिया. रक्त वाढवण्यासाठी योग्य आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चला तर मग, जाणून घेऊया शरीरात रक्त वाढवण्यासाठी कोणत्या खाद्यपदार्थांचा समावेश करावा.

लाल मांस

लाल मांसामध्ये भरपूर लोह असतो. जे की रक्तवृद्धीसाठी उपयुक्त आहे. मटन, बीफ आणि चिकन यामध्ये लोह असतो, जे शरीरात रक्ताची मात्रा वाढवते.

पालेभाज्या

पालक, मेथी, शेवगा यामध्ये लोह आणि फॉलिक ऍसिड्स असतात. या भाज्या रक्तवृद्धीसाठी महत्त्वाच्या आहेत.

डाळी आणि कडधान्ये

सोयाबीन, मूग डाळ, चणा, राजमा यामध्ये प्रोटीन आणि लोह असतो. ते शरीरात रक्त वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहेत.

ताजे फळ

साफरचंद, पेरू आणि स्ट्रॉबेरी यामध्ये लोह आणि व्हिटॅमिन C असतो. यामुळे शरीरात चांगले होते.

ड्रायफ्रुटस

काजू आणि बदाम यामध्ये लोह आणि फायबर्स असतात. हे स्नॅक्स रक्त वाढवण्यासाठी उत्तम आहेत.

अंजीर

अंजीरांमध्ये लोह आहे, जे रक्तवृद्धीसाठी फायदेशीर आहे. याचे सेवन रक्त वाढवते आणि शरीराला ऊर्जा प्रदान करते.

मान दुखीमुळे त्रस्त आहात? मग 'हे' योगासने करा नियमित

येथे क्लिक करा...