Sandip Kapde
छत्रपती शिवाजी महाराजांनी आर्थिक नियोजनात शेतकरी आणि सैनिकांना केंद्रस्थानी ठेवले.
राज्याच्या कोषागारात युद्धात हस्तगत केलेला संपत्ती जमा करण्याची परंपरा शिवकाळात होती.
शिवरायांनी उद्योग आणि व्यापाराला चालना देऊन अर्थव्यवस्था बळकट केली.
योग्य आणि माफक करसंकलन शिवरायांच्या अर्थनीतीचा महत्त्वाचा भाग होता.
शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी दादोजी कोंडदेवांना जबाबदारी दिली होती.
महसूल विभागाला न्यायोचित करवसुलीसाठी शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे मोजमाप करायला सांगितले.
मुलुखगिरीत पीक नष्ट करणाऱ्या सैनिकांना कठोर शिक्षा देण्यात आली.
मावळ्यांना शेतीसोबत सैन्य सेवेस प्रवृत्त करून अर्थतज्ज्ञांसारखे नियोजन केले.
शिवरायांचा सागरी कायदा इंग्रज आणि पोर्तुगीजांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी ठरला.
१६७४ मध्ये मराठा आरमारात ७४ युद्धनौका सज्ज होत्या.
जहाजबांधणी उद्योगासाठी मागास जातींना सामावून घेतले गेले.
कुलाबा बंदरावर मराठा आरमारासाठी प्रगत जहाजबांधणी केली जात होती.
शिवरायांनी सागरी संरक्षणासाठी स्वतंत्र आरमारी तुकड्या तयार केल्या.
व्यापार वाढावा यासाठी रायगड किल्ल्याजवळ भक्कम बाजारपेठ निर्माण केली.
सैन्याला योग्य दरात वस्तू उपलब्ध होण्यासाठी व्यापार धोरण राबवले.
शस्त्रास्त्र निर्मितीला चालना देऊन स्वयंपूर्णतेचा मार्ग स्वीकारला.
किल्ल्यांची सुरक्षितता राखण्यासाठी गडकऱ्यांना कठोर सूचना देण्यात आल्या.
आग प्रतिबंधक उपाय म्हणून कोठारात दिव्याच्या वापराबाबत नियम घालण्यात आले.
औद्योगिक सुरक्षिततेची संकल्पना शिवकाळातच प्रस्थापित झाली होती.
आधुनिक काळातही शिवरायांचे अर्थकारण प्रेरणादायी ठरते.
विनायक श्रीधर अभ्यंकर यांनी जागृती अभियान ब्लॉगमध्ये ही माहिती दिली आहे.