Aarti Badade
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात असलेलं उरूण-इस्लामपूर हे सुमारे ७५ हजार लोकसंख्येचं निमशहरी आणि वेगाने वाढणारं शहर आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून क्रांतिकारकांच्या योगदानामुळे इस्लामपूरचं नाव इतिहासात कोरलं गेलं आहे.
पूर्वीच्या सातारा जिल्ह्यातील या गावात मोठी मुस्लिम लोकसंख्या होती. गावाच्या चारही बाजूंना असलेले पीर याची साक्ष देतात.
उत्तर मध्ययुगात, आदिलशाही राजवटीच्या काळात इस्लामपूर नगराची स्थापना झाली.
या गावाचं मूळ नाव ‘ईश्वरपूर’ होतं असं मानलं जातं, कारण इथे मंदिरांची संख्या मोठी होती.
उरूण आणि इस्लामपूरच्या सीमेवर असलेलं उरणाई देवीचं प्राचीन मंदिर आजही भक्तांसाठी श्रद्धेचं केंद्र आहे.
पूर्वी उरूण आणि इस्लामपूर ही दोन वेगळी गावं होती, पण आता ती एकत्रितपणे एकच ओळख म्हणून ओळखली जातात.
या गावात धार्मिक सलोखा आहे. इथे लोक कोणताही पंथ न पाहता एकमेकांच्या सणांमध्ये उत्साहाने सहभागी होतात.