सकाळ डिजिटल टीम
नोव्हेंबर ते डिसेंबर १९३२ दरम्यान ऑस्ट्रेलियन सैनिक आणि इमू नावाचे पक्षी यांच्यात एक अनोखे युद्ध झाले.
The Great Emu War of 1932
sakal
पिकांचे नुकसान करणाऱ्या इमूंवर नियंत्रणासाठी ही अपयशी लष्करी मोहीम राबवली गेली. अपयशी म्हणण्याचे कारण असे, की या युद्धात ऑस्ट्रेलियाचे सैनिक चक्क पक्ष्यांकडून हरले होते.
The Great Emu War of 1932
sakal
इमू हे ५ फुटांपेक्षा जास्त उंच आणि ४५ किलोपेक्षा अधिक वजन असलेले उडू न शकणारे मोठे पक्षी असतात. पंख नसले तरी हे पक्षी ताशी ५० किलोमीटर वेगाने धावू शकतात.
The Great Emu War of 1932
sakal
हे पक्षी दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करून वेस्टर्न ऑस्ट्रेलियातील कॅम्पियन जिल्ह्यात आले आणि त्यांनी गहू व इतर पिकांचे अतोनात नुकसान केले होते.
The Great Emu War of 1932
sakal
शेतकऱ्यांच्या विनंतीवरून संरक्षण मंत्री जॉर्ज पियर (George Pearce) यांनी रॉयल ऑस्ट्रेलियन आर्टिलरीच्या तीन जवानांना मशीन गन आणि १०,००० काडतुसांसह पाठवले.
The Great Emu War of 1932
sakal
पक्ष्यांच्या थव्यावर गोळीबार केल्यावर ते सर्व दिशांना पळाले आणि शस्त्र बिघडल्यामुळे सुरुवातीला फक्त ३० पक्षी मारले गेले.
The Great Emu War of 1932
sakal
इमू ताशी ५० किमी वेगाने पळत असल्याने खडबडीत जमिनीवर गाड्या त्यांच्या पुढे जाऊ शकल्या नाहीत आणि त्यांच्या कठीण कातडीमुळे गोळ्यांचा प्रभाव पडला नाही.
The Great Emu War of 1932
sakal
प्रत्येक थव्यातील एक पक्षी पहारेकरी म्हणून इतरांना धोक्याची पूर्वसूचना देत असे, ज्यामुळे त्यांना पळून जाण्याची संधी मिळे.
The Great Emu War of 1932
sakal
खर्च झालेल्या गोळ्यांच्या तुलनेत मृत पक्ष्यांची संख्या अत्यंत अल्प असल्याने या मोहिमेची खिल्ली उडाली आणि इमूंना विजेते घोषित केले गेले.
The Great Emu War of 1932
sakal
१९३४ मध्ये सरकारने काडतुसे आणि बक्षिसे देऊन शिकार करण्यास प्रोत्साहन दिले पण अखेर १९९९ मध्ये इमू पक्ष्यांना कायद्याने संरक्षित घोषित केले गेले.
The Great Emu War of 1932
sakal
सुट्टीसाठी आलेले ब्रिटिश जोडपे ३० वर्षे तामिळनाडूच्या जंगलातच का राहिले?
Story of Bob and Tanya
sakal