Anuradha Vipat
छोट्या पडद्यावरची लोकप्रिय नायिका म्हणून रेश्मा शिंदेला ओळखलं जातं.
रेश्मा शिंदे आणि पवनचा विवाहसोहळा २९ नोव्हेंबरला थाटामाटात पार पडला.
आता नुकत्याचं दिलेल्या मुलाखतीत रेश्माने पवन हा साऊथ इंडियन असून तिचं सासर बंगळुरुला असल्याचं सांगितलं आहे.
रेश्माला लग्नानंतर सासरी गेल्यावर तिने पहिला पदार्थ कोणता बनवला होता? असा प्रश्न विचारण्यात आला
यावर रेश्मा म्हणाली, पहिल्या दिवशी मी सासरी कोबीची भाजी, पुलाव राइस, सांबर राइस , फ्लॉवर-मटरची आणि भेडींची भाजी आणि बीटाची कोशिंबीर बनवली होती.
“साऊथच्या जेवणात मी पहिल्याच दिवशी मराठी तडका लावला होता.” असं रेश्माने सांगितलं
आता घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत सध्या रेश्मा जानकी हे पात्र साकारत आहे