शिवराज्याभिषेकाला रायगडावर जेवणात काय मेनू होता?

Sandip Kapde

राज्याभिषेक सोहळा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळा रायगडावर अत्यंत भव्यतेने पार पडला होता.

What Was Served During the Rajyabhishek Feast | esakal

इतिहास

इतिहासात आपण याबद्दल अनेकदा वाचले आहे, पण त्या दिवशीच्या जेवणाच्या थाटाविषयी फारशी माहिती क्वचितच मिळते.

What Was Served During the Rajyabhishek Feast | esakal

राज्याभिषेक

राज्याभिषेकासारख्या महान सोहळ्यात जेवणात काय वाढण्यात आले असेल, हा प्रश्न अनेकांना उत्सुकता निर्माण करणारा आहे.

What Was Served During the Rajyabhishek Feast | esakal

पारंपरिक भोजन

शिवकालीन काळात सण-समारंभांमध्ये खास प्रकारचं पारंपरिक भोजन दिलं जात असे.

What Was Served During the Rajyabhishek Feast | esakal

१६व्या-१७व्या शतकात

१६व्या-१७व्या शतकातील मिष्टान्नात पुरणपोळी (पु.मांडे), बासुंदी, कलाकंद आणि सुधारस यांचा समावेश असे.

What Was Served During the Rajyabhishek Feast | esakal

झणझणीत चटण्या

त्यासोबत झणझणीत चटण्या - अमसूल, आवळा, ठेचा आणि कोशिंबीर, भरीत, भाकरी, थालीपीठ हे पदार्थ हमखास असायचे.

What Was Served During the Rajyabhishek Feast | esakal

वयोवृद्ध मंडळी

लहान मुलं आणि वयोवृद्ध मंडळी रात्री दूध-भाकरीचा आहार करत असत, हेही त्या काळात सामान्य होतं.

What Was Served During the Rajyabhishek Feast | esakal

मेनू

मात्र राज्याभिषेकाच्या दिवशी नेमकं काय मेनू होता, याचं उत्तर आपल्याकडे केवळ अंदाजावरच आधारित आहे.

What Was Served During the Rajyabhishek Feast | esakal

रायगडची जीवनकथा

श.वि. आवळसकर यांच्या "रायगडची जीवनकथा" या पुस्तकात यासंदर्भात सविस्तर उल्लेख सापडतो.

What Was Served During the Rajyabhishek Feast | esakal

पंगती

त्यात त्यांनी नमूद केलं आहे की, रायगडावर दहा दिवस सतत जेवणाच्या पंगती चालू होत्या.

What Was Served During the Rajyabhishek Feast | esakal

दक्षिणा

प्रत्येक भोजन करणाऱ्या व्यक्तीस दक्षिणाही देण्यात येत होती. यावरून त्या सोहळ्याचा भव्यपणा लक्षात येतो.

What Was Served During the Rajyabhishek Feast | esakal

इंग्रज अधिकारी

इंग्रज अधिकारी हेन्री ऑक्ससेंडेन याने त्याच्या डायरीत त्या काळात मराठी लोक कसे खात होते, याचे वर्णन केले आहे.

What Was Served During the Rajyabhishek Feast | esakal

खिचडी

त्यानुसार, स्थानिक लोक डाळ-तांदुळावर लोणी घालून खायचे. म्हणजेच मुगडाळीची खिचडी हा प्रमुख प्रकार होता.

What Was Served During the Rajyabhishek Feast | esakal

मांसाहारी जेवण

ऑक्ससेंडेनसाठी मात्र खास मांसाहारी जेवणाची वेगळी सोय करण्यात आली होती.

What Was Served During the Rajyabhishek Feast | eskala

दक्षता

त्याला मुख्य सोहळ्यापासून दोन किलोमीटर दूर राहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती, यावरून पाहुण्यांबाबतची दक्षता लक्षात येते.

What Was Served During the Rajyabhishek Feast | esakal

छपाईचा गड रायगड! शिवरायांनी कशी सुरू केली होती पहिली प्रिंटिंग प्रेस?

first printing press established by Chhatrapati Shivaji Maharaj at Raigad Fort | esakal
येथे क्लिक करा