राहुल शेळके
मुंबईच्या दलाल स्ट्रीटवर असणारी भव्य BSEची इमारत ही आशियातील सर्वात जुना शेअर बाजार आहे. या ठिकाणी रोज करोडो रुपयांची देवाण-घेवाण होते.
१८४० मध्ये मुंबईतील व्यापारी एका मैदानात जमून शेअर ट्रेडिंग करायचे. सुरुवातीला ५ व्यापाऱ्यांनी सुरु केलेला हा व्यवसाय होता.
सुरुवातीला कापसाची दलाली मुख्य व्यवसाय होता. नंतर शेअर्सच्या खरेदी-विक्रीला सुरुवात झाली
वयाच्या विशीत गुजराती व्यापारी प्रेमचंद रॉयचंद यांच्याकडे शेअर बाजाराचे नेतृत्व होते. मुंबई शेअर बाजाराचा पहिला मोठा ब्रोकर होता
१८६१ मध्ये अमेरिकेत युद्धामुळे इंग्लंडमध्ये भारतीय कापसाला मोठी मागणी होती. शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर भांडवलाचा ओघ वाढला.
युद्ध संपल्यानंतर भारतीय कापसाची मागणी कमी झाली. अनेक ब्रोकर्स दिवाळखोरीत गेले, प्रेमचंद रॉयचंद यांचाही मोठा तोटा झाला होता.
मुंबईतील दलाल स्ट्रीटमध्ये १०० रुपये भाड्याने हॉल घेऊन ट्रेडिंग सुरू झाले. ९ जुलै १८७५ ला अधिकृत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना झाली.
१९८६ पासून फिरोज जीजीभाय टॉवरमध्ये BSE कार्यरत आहे. भारतातील सर्वात मोठे आणि अत्याधुनिक स्टॉक एक्सचेंज आहे.
BSE आता डिजिटल ट्रेडिंगसह आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहे. लाखो गुंतवणूकदारांचा या शेअर बाजारावर विश्वास आहे.
Women Day 2025 : फक्त मावळेच नाहीत तर 'या' कर्तबगार स्त्रियांनी स्वराज्यासाठी दिलंय योगदान