Saisimran Ghashi
छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ हा महिलांसाठी सुवर्णकाळ होता. कारण नैतिक गुन्हयाविषयी स्वतः महाराज अत्यंत संवेदनशील होते.
स्वराज्यातील स्त्रियांना पूर्ण संरक्षण देण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले होते. एवढेच नव्हे तर युद्धप्रसंगी शत्रूपक्षातील स्त्रियांना आणि मुलांना जर कोणी पकडून आणले तर त्यांनाही साडी चोळीचा सन्मान देऊन स्त्रियांना परत पाठवीत असत.
पण हल्ली महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे.
याचे आणखी एक उदाहरण आहे पुण्यातील स्वारगेट येथे घडलेली अत्याचाराची घटना.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महिलेशी गैरवर्तन करणाऱ्यांना कठोर शासन केलं जायचं.
स्वराज्याची स्थापन केली त्या सुमारास एका गावच्या पाटलाने व्याभिचार केल्याचा गुन्हा त्यांच्यासमोर आला. त्यावेळी त्याचा एक हात व एक पाय तोडून महाराजांनी कडक शिक्षा केली होती.
चौरंग शिक्षा म्हणजे कोणती साधी शिक्षा नव्हे. त्या काळातील ही सर्वात कठोर शिक्षा होती. ज्यात हात आणि पाय कलम केले जायचे.
स्वराज्याशी बेइमान होणाऱ्या अधिकाऱ्यांना ते कडक शासन करीत असत. अफजलप्रकरणी खंडोजी खोपडे या देशमुखाचे हातपाय तोडून त्यांनी बेइमानीचे फळ दिले होते.
खाफीखान लिहितो की, 'शत्रू पक्षाकडील श्री सैनिकांनी पकडून आणली तर त्या स्त्रीचा सन्मान करून महाराज तिला तिच्या नातलगांकडे पाठवून देत असत.