सकाळ वृत्तसेवा
मुंबईत पूर्वी जास्त गर्दी नव्हती. आज मुंबई 24 तास गजबजलेली आहे. जाणून घ्या, या शहराचा ऐतिहासिक प्रवास.
एकेकाळी मुंबईत तुरळक वस्ती होती. कोळी व आगरी लोक व्यवसायासाठी मुंबईत यायचे आणि परत जायचे.
मुंबईत जंगल आणि प्राणी भरपूर होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी शहर रिकामे असायचे.
ब्रिटिश सरकारने वरळी, नायगाव आणि शिवडी भागात BIT चाळी बांधल्या, पण त्यात राहायला लोक तयार नव्हते.
लोकांना चाळीत आकर्षित करण्यासाठी सरकारने "लग्न करा आणि सोयी-सुविधा मिळवा" अशी जाहिरात दिली.
एकेकाळी 2 BHK फ्लॅट फक्त 5-7 रुपयांना आणि चाळीत 7 आणे भाड्यात मिळत होते!
मुंबई आणि ठाणे यांना जोडणारी पहिली रेल्वे सुरू झाली. लोकांना शहरात यायला प्रोत्साहन देण्यासाठी जाहिरात दिली गेली.
लोकांच्या वाढत्या संख्येमुळे गिरण्या, व्यवसाय वाढले आणि BDD चाळी उभारल्या गेल्या.
आजची मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. तिच्या प्रवासाची हीच कहाणी आहे.