२०८०मध्ये अमेरिका कशी दिसेल? शास्त्रज्ञांच्या अहवालातून धक्कादायक खुलासा...

Mansi Khambe

संशोधन

शास्त्रज्ञांच्या नवीन संशोधनाने अमेरिकेच्या भविष्याबद्दल चिंताजनक संकेत समोर आले आहेत. जागतिक पर्यावरणीय संकट आणि अनियंत्रित तापमानामुळे पुढील ५ दशकांत अमेरिकेतील अनेक प्रदेश पूर्णपणे वाळवंटात बदलू शकतात.

America Look In 2080

|

ESakal

शास्त्रज्ञांचे इशारे

अनियंत्रित औद्योगिक विकासामुळे पृथ्वीचे हवामान चक्र विस्कळीत झाले आहे. परिणामी मानवी क्रियाकलापांमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून येत नसल्यामुळे तज्ञांकडून इशारा दिला जात आहे.

America Look In 2080

|

ESakal

भयावह चित्र

'पीअर जे' या आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकाच्या अभ्यासात भविष्याचे भयावह चित्र रेखाटले आहे. यात पुढील ५० ते ५५ वर्षांत अमेरिकेच्या भूगोलात होणाऱ्या विनाशकारी बदलांचे मूल्यांकन केले आहे.

America Look In 2080

|

ESakal

धोक्याचे सावट

ओपन अर्थ मॉनिटर सायबरइन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांतर्गत केलेल्या या अभ्यासात, शास्त्रज्ञांनी अमेरिकेच्या पश्चिम आणि नैऋत्य प्रदेशांमध्ये तीव्र दुष्काळ पडत असल्याचे नोंदवले आहे.

America Look In 2080

|

ESakal

शहरे ओसाड

तज्ज्ञांचा असा अंदाज आहे की, २०८० सालापर्यंत या प्रदेशांमधील किमान १० प्रमुख शहरे पूर्णपणे ओसाड होतील. नैसर्गिक जलस्रोतांचा ऱ्हास आणि तापमानातील प्रचंड वाढ यामुळे जीवन जगणे कठीण होईल.

America Look In 2080

|

ESakal

नकाशात बदल

तसेच अहवालात आजची लहान मुले वृद्ध होईपर्यंत अमेरिकेचा नकाशा पूर्णपणे बदललेला असेल. अनेक हिरवीगार आणि विकसित शहरे केवळ वाळूचे ढिग बनतील, असेही म्हटले आहे.

America Look In 2080

|

ESakal

मध्य अमेरिकेवरही परिणाम

मध्य अमेरिकेतील काही भागांवरही याचा परिणाम होऊ शकतो. सध्या मध्य अमेरिकेतील हिरवीगार कुरणे आणि रंगीबेरंगी रानफुलांनी बहरलेली सुंदर खोरी अखेरीस पूर्णपणे नष्ट होतील.

America Look In 2080

|

ESakal

शेती आणि पशुपालन नष्ट

तीव्र उष्णता आणि पावसाच्या कमतरतेमुळे काही वर्षांत, या भागांमध्ये केवळ सुकी काटेरी झुडपे शिल्लक राहतील, ज्यामुळे शेती आणि पशुपालन यांसारखे पारंपरिक व्यवसाय पूर्णपणे विस्कळीत होतील.

America Look In 2080

|

ESakal

लोको पायलट हाय-स्पीड ट्रेन कशी थांबवतात? रेल्वेत अचानक ब्रेक लावणे शक्य का नसते?

Railway Signal System

|

ESakal

येथे क्लिक करा