सकाळ डिजिटल टीम
होळीच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळले जातात, पण कॅलेंडरमध्ये रंगपंचमी ४-५ दिवसांनी दिसते. यामुळे रंग खेळण्याचा योग्य दिवस ठरवताना गोंधळ होऊ शकतो.
होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी धुळवड खेळला जातो. होळीची राख एकमेकांच्या अंगावर फासून धुळवड खेळायचा आणि नंतर आंघोळ केली जाते.
धुळवड या परंपरेत गाईच्या शेणाच्या गोवऱ्या, तूप, कापूर, आणि एरंडाची फांदी जाळून वातावरण शुद्ध करण्याचा हेतू असतो.
महाराष्ट्रात रंग खेळण्याची परंपरा फाल्गुन कृष्ण पंचमीला असते, ज्यामुळे हा दिवस रंगपंचमी म्हणून ओळखला जातो.
उत्तर भारतात होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळले जातात, जो परंपरेचा भाग आहे.
घरच्या घरी सोपी रेसिपीने गोड पदार्थ तयार करा आणि होळीच्या दिवशी आनंद लुटा.
धुळवड आणि रंगपंचमी या दोन्ही परंपरांचा आनंद घेत विविध ठिकाणी रंग खेळा!