Aarti Badade
खुदा हाफिज आणि अल्लाह हाफिज यांचा मुख्य अर्थ एकच आहे: "अल्लाह तुमचे रक्षण करो."
खुदा हा पर्शियन (फारसी) शब्द आहे, ज्याचा उपयोग इराणमध्ये होतो.अल्लाह हा अरबी शब्द आहे, जो इस्लामिक जगतात अधिक वापरला जातो.
दोन्ही शब्दांचा अर्थ एकच असला तरी, त्यांचा वापर सांस्कृतिक आणि भाषिक फरकामुळे वेगळा होतो.
जावेद अख्तर यांनी खुदा हाफिज आणि अल्लाह हाफिज यांतील फरक स्पष्ट केला. त्यानुसार, खुदा शब्द पर्शियन आहे आणि अल्लाह विशेष इस्लामिक शब्द आहे.
कट्टर सुन्नी मुस्लिम अल्लाह हाफिज वापरणे पसंत करतात कारण अल्लाह हा इस्लामाचा विशेष शब्द आहे.
पाकिस्तानमध्ये अल्लाह हाफिज चा वापर अधिक वाढला आहे, कारण इथे अल्लाह हा विशेष इस्लामिक शब्द मानला जातो.
भारतात, अजूनही खुदा हाफिज चा वापर अधिक प्रमाणात होतो, कारण इथे पर्शियन शब्दाचा अधिक वापर आहे.