Anushka Tapshalkar
कबर, मकबरा, दर्गा आणि मजार याबाबत अनेकांना गोंधळ असतो. चला समजून घेऊया!
मुस्लिम व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याला जमिनीत पुरलं जातं. जिथं पुरलं जातं ती जागा म्हणजे कबर.
इस्लामनुसार कबरवर कोणतंही बांधकाम न करता साधेपण जपणं गरजेचं आहे. पण श्रीमंत लोकांनी काळानुसार यावर बांधकामं सुरू केली.
मकबरा म्हणजे कबरवर बांधलेलं मोठं वास्तूशिल्प. यामध्ये संगमरवरी दगड, महाल, छत्र्या यांचा समावेश असतो.
ताजमहल, हुमायूं का मकबरा, बीबी का मकबरा हे प्रसिद्ध मकबरे आहेत. त्यांना बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते.
सुफी संत, पीर-फकीर यांच्या कबरीवर बांधलेली स्मृतीस्थळे म्हणजे दर्गा किंवा मजार.
सुफी पंथात व्यक्तिपूजेला मान्यता आहे. म्हणूनच संतांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचं दर्शन घेण्यासाठी दर्गे बांधले जातात.
दर्ग्यात फुलांची चादर, इत्तर, उदबत्त्या, आणि जियारत केल्या जातात. इथं हिंदू-मुस्लिम दोघंही भेट देतात.
ख्वाजा गरीब नवाज (अजमेर), शेख सलीम चिश्ती (फतेहपूर सिक्री), सैलानी बाबा (मेहकर) – हे प्रसिद्ध दर्गे आहेत.