Puja Bonkile
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले.
पाकिस्तानमधील ९ दहशवादी तळे उद्धवस्त केले.
नंतर पाकिस्तानेने भारतावर हल्ला करायला सुरूवात केली पण त्यांचे हल्ले भारतीय सैन्यांनी अपयशी ठरवले.
या संघर्षाला तीन दिवस झाले असून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे.
या वाढत्या संघर्षामुळे प्रत्यक्ष युद्धाला सुरूवात झाली का असा प्रश्न निर्माण होत आहे.
चला तर मग जाणून घेऊया युद्ध आणि संघर्षातील नेमका फरक काय आहे.
साधारपणे युद्ध हे मोठ्या प्रमाणात होणारा आणि दिर्घकाळ चालणारा सळस्त्र संघर्ष असतो.
तर संघर्ष हा कोणत्याही प्रकारचा असू शकतो, पण त्याचे क्षेत्र मर्यादित असते.
युद्धामध्ये एक देश दुसऱ्या देशाच्या भौगोलिक अखंडेतवर किंवा स्वायत्ततेवर हल्ला करतो, तेव्हा युद्धाला सुरूवात होते.