Monika Shinde
गव्हाचे पीठ रोजच्या आहाराचा मुख्य घटक आहे. जर ते नीट साठवले नाही, तर कीटक आणि अळी येतात आणि आरोग्य धोक्यात येते.
पीठाच्या डब्यात काही तमालपत्र ठेवल्यास नैसर्गिक कीटकविरोधी गुणांमुळे कीटक आणि माइट्स दूर राहतात. हे सोप्पे आणि प्रभावी घरगुती उपाय आहे.
कडुलिंबाची पाने किंवा तमालपत्र पीठात ठेवल्यास कीटकांना वाढण्यापासून प्रतिबंध होतो. पीठ ताजे, सुगंधी आणि सुरक्षित राहते.
1–2 चमचे साधे मीठ पीठात घालल्यास ओलावा शोषला जातो आणि अळींच्या अंड्यांना उब मिळत नाही. पीठ दीर्घकाळ ताजे राहते.
पीठाच्या कंटेनरमध्ये 4–5 लवंग किंवा वेलची ठेवल्यास कीटक दूर राहतात आणि पीठ सुगंधी राहते. उन्हाळा आणि पावसाळ्यात ही युक्ती उपयुक्त आहे.
ओलावा टाळा, नैसर्गिक पानं ठेवा, मीठ आणि मसाले वापरा, गरम हवामानात फ्रीज करा. घरगुती उपायांनी पीठ ताजे आणि कीटकमुक्त राहते.